यूनिटी ग्रुप गॅरंटी लोन

यूनिटी महिला बचत गट ( JLG) कर्जाचे अनेक फायदे आहेत. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि घरगुती तसेच सामाजिक प्रगतीला चालना मिळते.

सहज उपलब्ध कर्ज

बँक किंवा सहकारी संस्थेकडून थेट कर्ज घेण्यापेक्षा बचत गटातून कर्ज पटकन व सोप्या प्रक्रियेत मिळते.

कमी व्याजदर

खासगी सावकारांपेक्षा बचत गटाचे कर्ज स्वस्त व परवडणारे असते.

लहान रक्कमेतून सुरुवात

गरजेनुसार थोडीफार रक्कम कर्ज स्वरूपात सहज उपलब्ध होते, ज्यामुळे छोट्या व्यवसायांना चालना मिळते.

आर्थिक स्वावलंबन

महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, शिक्षण, आरोग्य, शेती यासाठी कर्ज घेऊन स्वावलंबी होता येते.

विश्वास व परस्पर सहकार्य

गटातील सदस्यांमध्ये एकमेकांवर विश्वास वाढतो, कारण सर्वजण मिळून हप्ते फेडतात व एकमेकांना मदत करतात.

बचतीची सवय

लहान-लहान बचत करून गटाची भांडवलशक्ती वाढते आणि मोठे कर्ज घेणे शक्य होते.

सरकारी योजना व लाभ

अनेक शासकीय योजना व सबसिडी महिला बचत गटांमार्फत दिल्या जातात.

निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढ

पैशाचे व्यवस्थापन, बैठक, कर्जवाटप यामध्ये सहभाग घेतल्याने महिलांचा आत्मविश्वास आणि समाजातील स्थान मजबूत होते.

सामाजिक विकास

गटाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा उपक्रमांनाही चालना.

About us-

सर्वसामान्यांसाठी – आर्थिक सक्षमतेचा मार्ग

दि यूनिट महिला अर्बन सोसायटी ही संस्था केवळ महिलांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील समर्पित आहे. समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तरच खरी सामाजिक समृध्दी साधता येते, ही आमची ठाम भूमिका आहे.

आज अनेक कुटुंबं अशी आहेत की जे काम करण्यास इच्छुक असतात, परंतु योग्य मार्गदर्शन, कौशल्य किंवा संधींच्या अभावामुळे त्यांच्या प्रगतीला चालना मिळत नाही. आम्ही अशा नागरिकांसाठी खालील प्रकारे कार्य करतो:

🌱 उद्योजकतेला प्रोत्साहन

लघुउद्योग, हस्तकला, घरगुती व्यवसाय यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. महिलांसोबतच पुरुषांनाही विविध कौशल्यविकास कार्यशाळा उपलब्ध करून दिल्या जातात.

💼 स्वयंरोजगार संधी निर्माण

आमच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सूचनांची देवाणघेवाण, कर्ज सल्ला, तसेच व्यावसायिक नियोजनासाठी मदत केली जाते.

📚 आर्थिक साक्षरता अभियान

बचत, गुंतवणूक, पतसंस्था, बँकिंग सुविधा, डिजिटल व्यवहार अशा विषयांवर मार्गदर्शन करून सामान्य नागरिकांना अर्थसाक्षर बनवण्याचे कार्य सातत्याने केले जाते.

🏫 शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण

तरुण तरुणींना व्यावसायिक कोर्सेस, संगणक शिक्षण, इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी तयार केले जाते.

🤝 समुदाय विकास उपक्रम

स्थानीय नागरिकांचा सहभाग असलेले लघुप्रकल्प, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, तसेच सामाजिक उत्तरदायित्व वाढवणारे उपक्रम आम्ही राबवतो.

आमचा विश्वास आहे की जेव्हा समाजातील सामान्य माणूस सक्षम होतो, तेव्हाच देशाची खरी प्रगती घडते.

दि यूनिट महिला अर्बन सोसायटी म्हणून आम्ही या आर्थिक स्वावलंबनाच्या वाटचालीत प्रत्येक पाऊल नागरिकांसोबत चालतो – सक्षमता, सन्मान आणि स्वाभिमान यांचा वारसा जपत.

आमच्या बद्दल – युनीटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

युनीटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही एक अग्रगण्य महिला व नगरीक कर्ज संस्था आहे, जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि छोटे व मध्यम उद्योगांना समर्थन देण्यासाठी कार्यरत आहे. आमचा उद्देश प्रत्येक सदस्याला आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षित भविष्य मिळवून देणे आहे.

आम्ही विविध प्रकारची कर्ज योजना देतो:

  • युनीटी लखपती योजना – महिलांच्या गटासाठी आर्थिक सहाय्य.

  • युनीटी महिला अर्बन JLG (Joint Liability Group) – प्रत्येक गटामध्ये किमान ५ महिलांसाठी कर्ज सुविधा.

  • युनीटी गोल्ड लोन – सोयीस्कर आणि कमी व्याजदराने सोने रक्कम कर्ज.

  • युनीटी त्वरीत कर्ज – १०,००० ते ५०,००० रुपये फक्त ३ दिवसांत.

  • युनीटी सक्षम कर्ज – १०,००० ते २,००,००० रुपये फक्त २ महिन्यांच्या व्यवहारानंतर.

संस्थेच्या वैशिष्ट्ये:

  • संगणकीकृत शाखा आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग

  • मोबाइल बँकिंग, आधार पेमेंट, मायक्रो ATM आणि SMS सेवा

  • जीवन विमा मोफत

आमचा विश्वास आहे – “एकी हिच आमची ताकद”, आणि प्रत्येक सदस्याचा विकास हे आमचे प्राधान्य आहे.

संपर्क:
नविन बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, काटोल – मो. 9146409703
सावनेर शाखा – कमत प्रावटिंग न्कुल महाजन लेआऊट, सावनेर – मो. 9168409703 / 9371409703
ईमेल: the.unity.muccsl@gmail.com